बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ला अनिल परबांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई | महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील काही काळापासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे राज्यासाठी रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. यावर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देऊन रेल्वेवाहतुकीला परवानगी दिली आहे.

राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी 7 मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली. रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन आज पहिली रेल्वे रवाना केली. परिवहनमंत्री अनिल परब यांनी या एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवला.

प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून सोमवारी ऑक्सिजन एक्स्प्रेसला रवानाही करण्यात आलं. या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या पाच दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला मिळणार आहे. या एक्स्प्रेसला सिग्नल्सचा कमीत कमी अडथळा येईल अशा पद्धतीने ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला असून केवळ दीड दिवसात ती विशाखापट्टणम येथे पोहोचेल.

दरम्यान, एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजूरी दिली. त्यामुळे यापुढील काळात प्राणवायूच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणं शक्य होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार!

चेन्नईचा राजस्थानवर सुपर विजय, गुणतालिकेत घेतली भरारी

…म्हणून या सीझनला आत्तापर्यंत हार्दिक गोलंदाजी करताना दिसला नाही’; मुंबईच्या गोटातून महत्त्वाची माहिती

पुण्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी कमी व्हायला सुरुवात, पाहा आजची आकडेवारी

‘देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मंत्री लेडीज बारमध्ये जातात’; संजय गायकवाडांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More