बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Sharad Pawar: शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका, म्हणाले…

सांगली| राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवार यांनी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विकासात्मक राजकारणाची देशाला गरज आहे. राजकारण सुद्धा सर्वसामान्यांना न्याय देणारं हवं, असं शरद पवार म्हणाले आहेत.

आजपर्यंत माणसं जोडण्याचं काम झालं. मात्र, आज धर्माच्या नावाने अंधकार पसरवण्याचं काम सुरू आहे. देशासाठी जे हुतात्मा झाले त्यांच्यावर टीका करणारे नेतृत्व देशात पहायला मिळतंय, असं म्हणत त्यांनी नाव न घेता मोदींवर टीका केली आहे. देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केलं जात आहे. आता आपल्याला धर्मांध शक्तींविरोधात काम सुरू करावं लागेल, असं शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधताना म्हटलं आहे.

लोकांमध्येही त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी कर्नाटकचा उल्लेख केला आहे. भाजपशासित कर्नाटक राज्यात अल्पसंख्याकांच्या दुकानातून मालाची खरेदी करू नका, अशा प्रकारचा फतवा काही संघटनांनी काढला. या प्रकारची कटुता निर्माण करायचे काम जर राज्य हातामध्ये असलेले घटक करू लागले, तर देश पुढे कसा जाईल?, असा प्रश्न शरद पवारांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची गुढी राष्ट्रवादीच्या माध्यमातून उभी केली आहे असं म्हणत शिवाजीराव नाईक यांचं स्वागत करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार वेगळ्या विचाराने काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून राज्याचा विकास होत आहे, असं शरद पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“6 खासदारांवर कुणीही पंतप्रधान होत नाही हे शरद पवारांना…”

“गृहखाते काय भाजपच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी तयार केलं आहे का?”

“मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो म्हणून…”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

“महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे”

Corona विषयी तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More