बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पॅराशूट रायडिंग करताना घडलं असं काही… पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल

नवी दिल्ली | अनेकांना समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर बन्जी जंपिग, पॅराशुट रायडिंग यांसारख्या रोमांचक खेळ खेळण्याची इच्छा असते. मात्र यामध्ये अपघात घडण्याची भीती मोठ्या प्रमाणात असते. अशाच एका अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. पॅराशूट रायडिंग करत असताना एका जोडप्याचा हा व्हिडीओ आहे.

या व्हिडीओमध्ये एक जोडपं पॅराशूट रायडिंग करताना दिसत आहे. मात्र, पॅराशूट बऱ्याच वर गेल्यानंतर पॅराशूटला बांधलेली दोरी अचानक तुटली आहे. दोरी तुटल्याने तेथील पाहणारे लोक ओरडू लागले. पॅराशूट तूटल्यानंतर पॅराशूटसह जोडपं समुद्रात कोसळलं आहे. त्यानंतर तेथील लोक त्यांना वाचवण्यासाठी गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

मात्र, पुढे त्या जोडप्याचं काय झालं? त्या जोडप्याचे प्राण वाचवण्यात तेथील लोकांना यश आले का? याबद्दल मात्र व्हिडीओतून समजू शकले नाही. दिव येथील नगोआ बीचवर हा अपघात घडला आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा अशा असुरक्षित खेळाबद्दलची भीती निर्माण झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अशा घटना यापूर्वीही अनेकवेळा घडलेल्या आहेत. अनेक पर्यटक फिरायला म्हणून बीचवर वगैरे जातात आणि थ्रील म्हणून असे खेळ खेळतात. मात्र असे खेळ खेळताना यामधील सुरक्षा तपासूनच मग खेळण्याचा निर्णय घ्यायला हवेत. कारण काही क्षणाचं हे थ्रिल जिवघेणं ठरू शकतं. असे अपघात घडून अनेक वेळा अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पाहा व्हिडीओ

 

थोडक्यात बातम्या-

“बाळासाहेबांची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन आस्मानचा फरक”

“नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत तिला…”, ‘या’ मंत्र्याची कंगनाविरोधात रोखठोक भूमिका

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने गडकरी हळहळले, म्हणाले…

…तर इतर सर्व महामंडळातील कर्मचारीही विलीनीकरणाची मागणी करतील

लोणावळ्याच्या तन्वी बंगल्यात पोलीस पोहोचले अन् समोर जे दिसलं ते पाहून हादरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More