अवघ्या 100 रुपयांसाठी दाम्पत्याने मिळून केली युवकाची हत्या

नवी दिल्ली | दिल्लीमधील मंगोलपुरी येथे धक्कादायक घटना घडली आहे. केवळ 100 रुपयांसाठी दाम्पत्याने मिळून एका युवकाची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित युवकाचे नाव अजित असं असून दाम्पत्यातील पतीचं नाव जितेंद्र असं आहे.

अजित याने जितेंद्रचे 100 रूपये देणे होते. या 100 रुपयांवरुन दोघांमध्ये भांडण झाली होती. ही भांडणं इतकी वाढली की, जितेंद्र हा चाकू घेऊन अजितच्या घरात घुसला आणि त्याने अजितवर चाकूने हल्ला केला. या भांडणात जितेंद्रसोबत त्यांची पत्नी देखील होती. जितेंद्रने अजितच्या मांडीवर चाकूने वार केले. यात अजित गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

16 मे रोजी दिल्ली पोलिसांना एक कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, माझ्या मुलावर कुणीतरी चाकूने वार केले आहे. हा पीसीआर कॉल संजय गांधी रुग्णालयामधून आला होता. दिल्ली पोलिसांची टीम रुग्णालयात पोहोचताच रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या युवकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान, ही घटना राजपार्क पोलीस स्टेशन परिसरातील मंगोलपुरी पी-ब्लॉकमधील आहे. या घटनेनंतर जितेंद्र आणि त्याची पत्नी पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्रची पत्नी रेश्मा हिला अटक केली आहे, तर जितेंद्रचा पोलीस शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘तुम्ही भारताची जी निंदा करताय त्यानं मला रडू येतंय’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचं भारत प्रेम

DRDO चं ‘हे’ ॲंन्टी कोव्हिड औषध आजपासून बाजारात उपलब्ध शास्त्रज्ञ म्हणाले…

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाला…

‘या’ कंपनीकडून ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज; कोरोनाकाळात ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

आयकर अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर बलात्कार; व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

 

coupleCrimeDelhidelhi crimeescapehundred rupeeskilledMoneyMurderखूनगुन्हाठारदिल्लीदिल्ली गुन्हादोनपलायनपैसेशंभर रुपये