बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुन्हा कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने दाम्पत्याने उचललं धक्कादायक पाऊल!

मुंबई | मुंबईतील लोअर परेल परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका उच्चशिक्षित नवविवाहीत दाम्पत्याने पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अजय कुमार आणि सुजा हे दोघेही केरळ येथील रहिवासी होते. 10 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. मुंबईत दोघेही कामाला होते. अजयकुमार एका खासगी कंपनीत कामाला होता. तर सुजाही एका बँकेत काम करत होती. लग्न झाल्यानंतर दोघे जण लोअर परेलमध्ये राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी राहत्या घरात दोघांचे मृतदेह आढळून आले.

दोघेही बरे झाले होते. पण, पुन्हा एकदा कोरोनाची लक्षण जाणवू लागली होती. त्यामुळे नैराश्यात जाऊन दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी एक सुसाईट नोट पोलिसांना सापडली. सुसाईड नोटमध्ये कोरोनामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता – डाॅ. रणदीप गुलेरिया

राज कुंद्रा प्रकरणी क्राईम ब्रांचच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!

“हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं”

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी- नाना पटोले

नवविवाहित जोडप्यावर काळाचा घाला, अपघातात वधूवरासह सहा जणांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More