बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे सरकारवर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार

नवी दिल्ली | शिंदे गट आणि शिवसेना(Shivsena) यांच्यात खरी शिवसेना कोणाची, या वादासह पाच याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) गुरूवारी सुनावणी होणार होती. परंतु आता  न्यायालयाने ही सुनावणी सोमवारी होणार असल्याचे सांगितले आहे. शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही गटासाठी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुरूवारी सुनावणी सुरू असताना न्यायालयाने, तुर्तास पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असा निर्देश निवडणूक आयोगला दिले आहेत. राजकीय पक्षाला दुर्लक्षित करता येणार नाही, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचेही न्यायालयाने आजच्या सुनावणीत म्हणाले आहेत.

हे प्रकरण पाच  न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाण्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडून पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का?,  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्टला न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर काय निर्णय देईल, याची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे.

दरम्यान, कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी माध्यमांशी संवाद साधला, हे  प्रकरण घटनापीठाकडे द्यायला हवे, तसेच पक्षनिष्ठा निर्माण व्हायला हवी, असं मत बापट यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान शिंदे गट- शिवसेना यावरचा निर्णय न्यायालय सोमवारी देणार असले, तरी राज्यात मात्र काही राजकीय नेत्यांकडून मंत्रीमंडळ विस्तार पाच ऑगस्ट पर्यंत होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोमवारचा न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘म्हसोबाला नाही बायको सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीची अवस्था’, पडळकरांची टोलेबाजी

…अन् उर्फीने कपड्यांऐवजी चक्क गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच आज सुटणार?, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

शिंदे गटाचा तो आरोप खोटा?, शिवसेनेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आमटेंची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More