सुनावणीदरम्यान ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिंदेंच्या(Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत(Shivsena) निर्माण झालेल्या वादाचा आजपर्यंत अंतिम निकाल मिळालेला नाही. त्यामुळं धनुष्यबाण चिन्ह कोणाकडं जाणार हे जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार, असं चित्र दिसत आहे.

त्यातच या प्रकरणाची सुनावणी सात सदस्यीय खंडपीठाकडं व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाकडून करण्यात आली होती. परंतु ठाकरे गटाची ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

या खटल्यातील मेरिटनुसार यावर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आता पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार आहे.

दरम्यान, पुढील सुनावणीत इतर याचिकांवरही नियमित सुनावणी होणार आहे. ही सुनावणीही पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडेच होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-