बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

सोलापूर | संत बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसलेला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोहर मामासोबत दोन साथीदारांविरोधात लोकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशातच आता मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या आहेत.

कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत एका तरूणाची फसवणूक करण्याचा आरोप मनोहर मामावर आहे. त्याचबरोबर मनोहर मामावर बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपही आहेत. त्यामुळे करमाळा न्यायालयाने मनोहर मामाला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोहर मामा येत्या 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे.

माझ्याकडून मनोहर मामाने जवळपास 40 लाख रूपयांचा रो हाऊस घेतला होता. परंतु माझी कोणतीही कामं झाली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांच्याकडून परत मागितला. मात्र मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रूपये खर्च झाले आहेत. तु मला ते पैसे परत कर त्याच वेळी तुला मी रो हाऊस परत करेल, असं मनोहर मामा यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, त्यानंतर महेश आटोळे यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती पोलीस ठाण्यात दिली होती. मनोहर मामाने पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप मनोहर मामांनी फेटाळून लावले होते.

थोडक्यात बातम्या-

ठरलं तर! काँग्रेसकडून रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

चेन्नईच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची अपडेट! रायडू आयपीएल खेळणार की नाही?, आली मोठी माहिती समोर

राष्ट्रवादीच्या ‘या’ चार दिग्गज नेत्यांचे जावई किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर

जावेद अख्तर यांनी शिवसेनेच्या दबावाखाली…; कंगनाचा शिवसेनेवर गंभीर आरोप

“कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं, मोदी सर्वांचा सन्मान करतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More