“गाय मालकावर नाराज झाली, तरी ती खाटीकाच्या घरी जात नाही; आम्ही मोदींसोबत आहोत”
नवी दिल्ली | कोरोना साथीचा मुकाबला करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कमी पडले आहे, अशी टीका केंद्र सरकारचे कट्टर समर्थक व अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे. स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा आयुष्यात आणखीही महत्त्वाची कामे असतात, असा टोला देखील अनुपम खेर यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
देशभरातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती दिसून येत आहे. अनेकांनी यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवर आपला राग व्यक्त केला आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमधील अनेक दोषांसाठी सरकारची धोरणं जबाबदार असल्याचं सांगत सोशल नेटवर्किंगवरुन सरकावर निशाणा साधला जात आहे. मात्र याचदरम्यान केंद्र सरकारवर होत असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये अभिनेते आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनीही उडी घेतली आहे.
अभिनेते गजेंद्र चौहान यांनी म्हटले आहे की, गाय भलेही आपल्या मालकावर नाराज असेल; पण म्हणून काही ती कसायाच्या घरी जात नाही, असं महाभारत मालिकेत धर्मराजाची भूमिका साकारणारे गजेंद्र चौहान यांनी ट्विट करत म्हटलं आहे. गजेंद्र चौहान यांचं हे ट्विट 2 हजार 700 हून अधिक वेळा रिट्विट झालं आहे. तर 13 हजार जणांनी ते लाईक केलं आहे.
दरम्यान, अनुपम खेर यांनी देखील कोरोनामुळे नागरिकांचे होणारे हाल पाहून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांचे होणारे हाल, त्यामुळे नातेवाइकांची होणारी घालमेल, कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडून दिल्याचा उघडकीस आलेला प्रकार या घटनांनी देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.
गाय भले ही अपने मालिक से नाराज हो..लेकिन रूठकर कभी कसाई के घर नहीं जाती..!
इसलिए हम मोदी जी के साथ ही हैं 🚩
— Gajendra Chauhan (@Gajjusay) May 11, 2021
थोडक्यात बातम्या –
यशस्वी बिझनेसवुमन आणि टाइम्स ग्रुपच्या चेअरपर्सन पद्मभूषण इंदू जैन यांचं निधन
राज्य सरकार लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवणार का?, नवाब मलिक म्हणतात…
दुर्दैवी! ‘ही’ गर्भवती डॉक्टर शेवटच्या श्वासापर्यंत लोकांना करत होती सतर्क, पाहा व्हिडिओ
“केंद्राने कातडी बचाव धोरण स्विकारु नये”; केंद्र सरकारच्या याचिकेवर टीका
दोन दिवसांपूर्वी रूग्णालयातुन बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित महिलेचा ‘या’ शहरात सापडला मृतदेह
Comments are closed.