बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! खेकडा चक्क सिगरेट ओढतोय; ‘हा’ व्हिडीओ पाहून सारं जग झालंय थक्क

मुंबई | सोशल माध्यमांवर काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. मागे दोन लहान मुलं भांडत असतानाचा व्हिडीओ शंकरपाळ्या म्हणून सोशल माध्यमांवर धुमाकूळ घालत होता. अशातच एक आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चक्का एक खेकडा सिरगेट ओढताना दिसत आहे. भारतीय वन सेवेत अधिकारी असलेले सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे.

सरकार लोकांना धुम्रपान करण्यास मनाई करत आहे. धुम्रपानाने आपल्या आरोग्यास हानी होऊ शकते. त्यामुळे सिगरेटच्या पाकिटावरही संबंधित कंपनीने धुम्रपान जानलेना है, असं लिहिलेलं असतं. मात्र तरीही लोक सिगरेट ओढताना दिसतात. लोकांना सवय आहे आणि त्यांना व्यसन आहे हे आपण समजून घेऊ. परंतू खेकडा हो खेकड्याला सिगरेट ओढताना पाहाताना आपल्यालाही धक्का बसेल.

सिगरेट ओढल्यावर त्याचे तुकडे तिथेच टाकले होते त्यावेळी नेमका खेकडा आला. त्याने ती खाण्याची वस्तु समजून आपल्या तोंडात टाकली. त्यानंरत धूर येऊ लागला मात्र खेकडा इतकच करून थांबला नाहीतर त्याने आपल्या नांग्याच्या मदतीने सिगरेट ओढल्यासारखं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यादरम्यान तिथे असणारी मुलं हसताना दिसत आहेत.

दरम्यान, ही गोष्ट तशी गांभीर्याने घ्यायला हवी कारण चुकून त्या खेकड्याने जळती बाजू आपल्या तोंडात पकडली असती तर त्याला इजा झाली असती. एकीकडे आपण समाजात पशु-पक्षांच्या रक्षणासाठी जनजागृती करत असतो आणि या साध्या साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

 

थोडक्यात बातम्या-

अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ; रिलायन्स होम फायनान्स डिफॉल्टर यादीत

“काँग्रेसनं कर्नाटकला IT Hub बनवलं, भाजप कर्नाटकला Porn Hub बनवतंय”

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोनाची लस

कोणी काहीही म्हणू दे, महाराष्ट्र फर्स्ट हेच धोरण ठेवा- राज ठाकरे

‘हे राज्याला परवडणार नाही’; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More