बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून चक्क संजय राठोड यांच्याच गाडीपुढे झोपला युवक!

यवतमाळ | आमदार संजय राठोड यांच्या वाहनासमोर एक दिव्यांग युवक झोपून अचानक आडवा झाल्याने एकच खळबळ उडाली. आपल्या भागातील रस्त्याचे प्रलंबित कामासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचं कळतंय.

आमदार संजय राठोड दिग्रस विश्रामगृहावर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आले असता भेट न झाल्याने वैभव नगरमधील एका दिव्यांगाने चक्क झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी शासकीय विश्रामगृहातून बाहेर निघता वेळी अडवली. ही घटना काल सायंकाळच्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी लगेच भास्कर वाघमारे याला उठवून आमदार राठोड यांचेकडे घेऊन गेले. यावेळी भास्कर वाघमारे याने एकवेळ वैभव नगर येथे भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव  आलं होतं. या प्रकरणावरून बराच गदारोळ माजला. तसेच भाजपने आक्रमक पवित्रा घेत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर संजय राठोड यांना मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली.

थोडक्यात बातम्या- 

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला पहिलाच चेंडू, अन् दिग्गज आर्चरला ठोकला षटकार; सूर्यकुमार म्हणतो…

मोठी बातमी! मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी मिळाला आणखी एक मृतदेह!

मासिक पाळी दरम्यान तरुणीच्या डोळ्यातून वाहू लागलं रक्त, वाचा काय आहे प्रकरण

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते- मुंबई उच्च न्यायालय

नात्याला काळीमा फासणारी घटना; पॉर्न पाहून दारुड्या मुलानं आईवर केला लैंगिक अत्याचार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More