Top News भंडारा

या आईचा हंबरडा तुमच्या काळजाचं पाणी पाणी करेल का???

भंडारा | भंडाऱ्यातील शासकीय रूग्णालयात घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळाय. भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झालाय. या युनिटमध्ये एकूण 17 बालकं होती. यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलंय.

दरम्यान, रुग्णालयात दगावलेल्या लहान मुलांच्या पालकांनी रूग्णालयाच्या परिसरात एकच आक्रोश केलाय. आपल्या पोटचं मूल आता या जगात नाही हे समजताच बाळांच्या मातांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं.

यासंदर्भात कोणत्याही प्रकारची स्पष्ट माहिती देण्यात येत नसल्याचं बालकांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. शिवाय बालकांना भेटूही दिलं जात नसल्याने पालकांमध्ये संताप निर्माण झालाय.

ही घटना रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळंच घडली असल्याचं बालकांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या-

भंडाऱ्यातील पीडित कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत- राजेश टोपे

गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे निधन

…त्या दहा बालकांचा मृत्यू झाला नसून हत्या करण्यात आली आहे- राम शिंदे

“मुळात धरणवीर उपमुख्यमंत्र्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही”

“महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत द्यावी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या