Top News पुणे महाराष्ट्र

क्रूरतेचा कळस! रात्रीच्या अंधारात बैलाला गळफास देऊन बैलाची केली हत्या

पुणे | पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गावात माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. गोठ्यात बांधलेल्या अडीच वर्षांच्या बैलाला अज्ञात व्यक्तीनी ठार मारलं आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

गोठ्यात बांधलेल्या एका अडीच वर्षांच्या छोट्या बैलाला अज्ञात नराधमानं रात्रीच्या अंधारात गळफास देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बैलाचे मालक संदीप तोत्रे यांनी पंढरपूर येथून खिलारी जातीचे दीड वर्षे वयाचे वासरू विकत आणलं होतं. त्याला चांगला खुराक दिल्याने वासरू धष्ठ-पुष्ट झाले होते. या वासराला अनेकांनी चांगली किंमत देऊन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, संदीप तोत्रे यांनी हे वासरू विकले नाही. रात्रीच्या सुमारास कोणीतरी गोठ्यातील खांबाला दोरखंडानं बैलाला गळफास घेऊन ठार मारलं. संदीप तोत्रे यांनी या प्रकरणी मंचर पोलिसात गुन्हा दाखल करुन, आरोपी पकडून कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यात एका पिसाळलेल्या बैलाला जेसीबीने चिरडून ठार केल्याची बातमी समोर आली होती. या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला होता.

थोडक्यात बातम्या-

कृषी कायदे रातोरात आणलेले नाहीत-पंतप्रधान नरेंद्र मोदी

“उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ, शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा”

…म्हणून तर आम्ही 105 आमदार घरी बसवले आहेत- संजय राऊत

CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार; ‘या’ सरकारनं घेतला मोठा निर्णय

चारचाकी चालकांसाठी आनंदाची बातमी; सरकार लवकरच हा निर्णय लागू करणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या