सध्याच्या भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला तोड नाय!; सौरभ गांगुलीनं केलं तोंडभरुन कौतुक
मुंबई | भारतीय संघाचा फाॅर्ममध्ये असलेला खेळाडू रिषभ पंत विषयी मी खूप प्रभावित आहे. त्याने सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. सौरभ गांगुलीनं भारतीय संघाच्या आपल्या आवडत्या खेळाडूंच्या बाबतीत कौतुक केलं आहे. मात्र, भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत याच्याविषयी गांगुलीनं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
एका यूट्यूब चॅनलवर आपल्या भारतीय संघाबाबत त्याने कौतुक केलं. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांची फलंदाजी बघायला मला मजा येते. त्याने शार्दूल ठाकूर ची प्रशंसा करण्याअगोदर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला देखील आपले आवडते खेळाडू सांगितलं आहे.
सौरभ गांगुलीनं पहिले दोन सिजन दिल्ली कॅपिटल्स मध्ये रिषभ पंतला मार्गदर्शन केले आहे. श्रेयस अय्यर काही दुखापतीमुळे बाहेर असल्यामुळे 23 वर्षीय रिषभ पंतला आता आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. रिषभ पंत हा फाॅर्ममध्ये आहे. त्याच्या खांद्यावर आता संघाच्या कर्णधार पदाची धुरा आहे.
दरम्यान, गेल्या हंगामात ‘आयपीएल’ दरम्यान राजस्थान राॅयल्सचा संघ चांगला खेळ दर्शविण्यात अपयशी ठरला. त्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या नावासह त्याच्या संघातील काही खेळाडूंना सोडण्यात आले. आणि संजू सॅमसनला कर्णधार बनवण्यात आलं. ख्रिस माॅरिसचा देखील राजस्थानच्या संघात समावेश करण्याता आला.
थोडक्यात बातम्या –
निशब्द भावनांना बच्चू कडूंची साथ, ‘त्या’ चिमुकल्याला मिळाली सायकल!
राज्यात लागू शकतो ‘इतक्या’ दिवसांचा लॉकडाऊन; महत्त्वाची माहिती आली समोर
उद्धव ठाकरेंना फोन करून फडणवीसांनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!
“कोरोना पळून गेलाय, आता मास्क घालण्याची गरज नाही”
विराट कोहलीनं काढलं, शाहरुख खाननं घेतलं; ‘हा’ खेळाडू पुन्हा IPLच्या रणांगणात!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.