बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

मुंबई | राज्यातील महागाईने सर्वसामान्याचं कंबरडं मोडलं आहे. पावसाच्या वाढत्या प्रमाणामध्ये पूराची चिंता सतावत आहे. सामान्य नागरिकांना दैनंदिन वस्तू साठी भरपूर पैसे मोजावे लागत आहेत. यातच सामान्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

राज्यातील घरगुती गॅस सिलेंडरचे (LPG) दर वाढले आहे. नागरिकांना आता गॅस दरासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 14 किलोच्या गॅस सिंलेडर मध्ये 50 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. नागरिकांना आता घरगुती गॅस सिंलेडरसाठी 1000 रूपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 5 किलोच्या घरगुती सिंलेडर मध्येही 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

कोरोना (CORONA) नंतर विस्कटलेली घडी सांभाळण्यासाठी सर्वसामान्याचे प्रयत्न सुरुच आहे. रशिया- युक्रेनयुद्धा मुळे कच्चे तेल ही महागले होते. यातच आता गॅस सिलेंडर दराने गृहिणीचे बजेट सावरण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

जगभरात ऊर्जेची मागणी वाढली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दर वाढल्याचे सांगितलं जात आहे. दिल्लीत 14 किलो गॅसची 1053 रूपये किंमत आहे. मुंबईत 1052.50 रूपये मोजावे लागणार आहे. कोलकत्यात 1079 कर चेन्नईत 1068.50 रूपये इतके रूपये झालं आहे. 1 मे रोजी कमर्शियल गॅस सिंलेडर मध्ये वाढ करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या

शिवसेनेला आणखी एक झटका?; शिवसेना खासदाराच्या पत्राने टेन्शन वाढलं

‘मंत्रीपदाची संधी मिळाली तर…’; विजय शिवतारेंचं मोठं वक्तव्य

पुढचे 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेना आक्रमक; आणखी एका नेत्याची पक्षातून केली हकालपट्टी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More