बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील”

मुंबई | भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. यावरून शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला होता. तर राजकीय पटलावर देखील भाजप आणि सेना नेत्यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. त्यात यावरून आता निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

दादर मध्ये सेना भवन आहे. दादर कोणाच्या बापाचं नाही. तो दिवस लांब नाही ज्या दिवशी सेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील. संज्या गुंडगिरीच्या वार्ता करतो ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. लुक्का आहे एक नंबरचा, अशी खोचक टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केली आहे.

होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय आम्ही गुंड आहोत, असं राऊत म्हणाले होते.

दरम्यान, जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना तुमचे उद्धव ठाकरे आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आले आहेत. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?, अशी खोचक टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली होती. त्यानंतर आता भाजप विरूद्ध शिवसेना असा वाद रंगताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा’; MPSC चं मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी परिपत्रक

मुख्यमंत्री-संभाजीराजे यांच्यात दोन तास बैठक; 11 पैकी ‘या’ 6 मागण्या ठाकरे सरकारला मान्य

सारथी संस्थेला निधीची कुठलिही कमतरता पडू देणार नाही- अजित पवार

राज्याला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका; आरोग्य मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

भाजपला लागणार मोठी गळती, अनेक बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More