बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘थयथयाट केल्याने मेलेले परत येणार नाहीत, आम्ही काहीच करू शकत नाही’; मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली | देशातील कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाने हैदोस घातला आहे. हरियाणामध्येही कोरोनाने अनेकांचा बळी गेला आहे. मात्र यावर बोलताना मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नागरिकाना सहानूभुती न देत त्यांचा धीर वाढवण्याचा प्रयत्न करायचा तर त्यांनी  धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

मैत्री संबंधामुळे कोरोनाच्या रुग्णांचे आकडे आम्ही मीडियाला देत असल्याचं जनसंपर्क अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. जनतेला उत्तर देण्याची आमची जबाबदारी नाही, असा सवाल या पत्रकाराने खट्टर यांना केला. त्यावर, ही वेळ आकड्यांवर लक्ष ठेवण्याची नाही. ज्यांचा मृत्यू झाला ते आपल्या थयथयाटाने जिवंत होणार नाहीत. ही नैसर्गिक आपत्ती आहे. आम्ही काहीच करू शकत नाही, असं मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलं आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मनोहर लाल खट्टर रुग्णालयात आले होते.  त्यावेळी ते बोलत होते. याआधीही त्यांनी आमचं सरकार या महामारीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, राज्यातील आरोग्य सुविधांवर आम्ही लक्ष देत आहोत. आमच्याकडे पुरेसे बेड्स आणि व्हेंटिलेटर आहेत. मात्र नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन केलं पाहिजे, असं सांगतानाच चार दिवसात 5 लाख लोकांचं लसीकरण करण्याचं टार्गेट आम्ही ठेवल्याचं खट्टर यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

दिलदार ‘केकेआर’! पॅट कमिन्सनंतर केकेआरच्या आणखी एका खेळाडूने केली मदत

येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊसाची शक्यता, हवामानाचा खात्याचा शेतकऱ्यांना अलर्ट!

ज्युलिओ रिबेरोंच्या टिप्पणीवर फडणवीसांचं ओपन लेटर; म्हणाले, “माझ्या हातून….”

गर्भवती महिलेला स्ट्रेचर न मिळाल्याने धडपड करणाऱ्या डाॅक्टरांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

“तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन व्हा, उपाध्यक्ष होऊ शकता अट एकच…”, नेटकऱ्याच्या ट्विटकर अमृता फडणवीस भडकल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More