Top News खेळ

अर्जेंटीना फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची होणार चौकशी

अर्जेंटीना | नुकतंच अर्जेंटीनाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तर आता मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येणार आहे.

अर्जेंटीना सरकारच्या न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मातिआस मॉरीया हे मॅराडोना यांचे वकील असून त्यांनी मॅराडोना यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली होती.

मॉरीया यांच्या म्हणण्याप्रमाणे, “मॅराडोना यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली होती. मात्र त्यावेळी तिला पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे हा गुन्हा असून याची चौकशी व्हावी.”

अर्जेंटीनाची राजधानी ब्यूएनोस एअरस इथल्या स्थानिक न्यायाधीशांनी दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूच्या चौकशीबाबतच्या आदेशांवर सह्या केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

उर्मिला मातोंडकर शिवसेनेत करणार प्रवेश; उद्या घेणार पत्रकार परिषद

तिसऱ्या वनडे पूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; 2 प्रमुख खेळाडू संघाबाहेर

भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन

“तुमची पिढी संपेल मात्र हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही”

“शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच नितीन राऊतांचा गेम केला”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या