Top News देश

धक्कादायक! शीर कापलेल्या नग्न अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह

झारखंड | झारखंडमधील रांचीमध्ये ओरमांझी पोलिस स्टेशन परिसरातील जंगलात शीर कापलेल्या नग्न अवस्थेत एका तरूणीचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

संबंधित तरूणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. इतकेच नाही तर या तरूणीचं गुप्तांग कापलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्येच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चा आणि महिला मोर्चाने मोर्चा काढला आहे. यावेळी मोर्चादरम्यान महिलांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा पुतळा जाळला.

ओरमांझीतील मुलीसोबत ज्या प्रकारची घटना घडली आहे. ती कोणत्याही परिस्थितीत सहन करण्यायोग्य नाही. गुन्हेगारांनी दु: खाची मर्यादा ओलांडली, ज्याप्रकारे तरुणीच्या गुप्तांगाला इजा करत दुष्कृत्य केले आणि शिरच्छेद केला, असं भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी आरती कुजूर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुलींना संरक्षण देण्यात हेमंत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकार एक वर्ष पूर्ण झाल्याचा जल्लोष साजरा करत आहे. मात्र दुसरीकडे अशा घटना घडत असल्याचं कुजूर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शिवसेना नव्हे ही तर औरंगजेब सेना’; भाजपचा सेनेवर निशाणा

हिवरेबाजार, राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची 30 वर्षांची परंपरा खंडित

ड्रग प्रकरणी एनसीबीने ‘या’ अभिनेत्रीला केली अटक!

“शिवसैनिक झालाय गरीब-बापडा, सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा!”

शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला दररोज मिळणार ‘इतके’ रुपये; आसाम सरकारने घेतला मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या