बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडातात्या कराडकर पायी वारीवर ठाम; सरकारचा आदेश झुगारल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मागील वर्षी देखील कोरोनामुळे वारी रद्द करण्यात आली होती. काही मोजक्याच भाविकांना वारीसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातच आता ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी पायी वारी करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, असंही आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं. त्यामुळे काहीसा तणाव वाढला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय मागे देखील घेतला होता. पण आज सकाळी त्यांनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पहाटे 5 वाजता पायी चालण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पहाटे पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. तर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली. तसेच स्थानिक आमदार महेश लांडगे हे देखील त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे आता मोठी गोंधळाची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. तर पोलीस प्रशासन या प्रकरणावर काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलन देखील केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

जो समाज मागासलेलाच नाही त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही- गुणरत्न सदावर्ते

“ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करू असं सांगितलं जातं”

सॅल्यूट! कोरोनानं पालक गमावलेल्या 100 मुलांची जबाबदारी ‘या’ तरुणानं घेतली

“देशमुख यांच्यावर दाखल केलेला खटला बेकायदेशीर; कसाबलासुद्धा कायद्याचा फायदा मिळाला आहे”

‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More