Top News राजकारण

राज्य सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलाय- अजित पवार

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारचे निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलेले असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय.

प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलेला दिसतो. म्हणूनच असा टोकाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.”

“कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर न्याय आणि विधी खातं, अटर्नी जनरल, मुख्यमंत्री एकत्र बसून पुढे काय करायचं हे ठरवतील. काम सुरू करण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल,” असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, “केंद्र आणि राज्यसरकार असो विकासकामांमध्ये कुणीच राजकारण किंवा अडथळा करु नये. मी ३० वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतोय मी कधीही विकासकामात राजकारण आणलं नाही.”

थोडक्यात बातम्या-

‘चांगला कलाकार चांगली व्यक्ती असेलच असं नाही’; स्वरा भास्करचा कंगणाला टोला

“तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या, त्याचं वाचन सुरु झालं तर…”

“अशोक चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही”

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी तर आदित्य ठाकरेंनी राजीमाना द्यावा- भाजप

ठाकरे सरकारला धक्का! कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या