बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारकडून स्थगिती

मुंबई | शिवसेना (Shivsena) आमदारांचा मोठा गट एकनाथ शिंदेसोबत (Eknath Shinde) फुटल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजमीनामा देण्यापूर्वी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) शेवटच्या कॅबिनेट बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते.

औरंगाबचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर व नवी मुंबई विमानतळाला दी.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतला. मात्र, तत्कालिन उद्धव ठाकरे सरकारच्या या निर्णयाला शिंदे सरकारकडून (Shinde Goverment) स्थगिती देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आधीही या निर्णयावर आक्षेप घेतला होता. या तिन्ही नामांतराबाबत शिंदे सरकार पुन्हा एकदा नव्याने निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

दरम्यान, 29 जून रोजी महाविकास आघडी सरकारची शेवटी मंत्रिमंडळ बैठक पार पडली होती. यात तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तीन महत्त्वाच्या नामांतर प्रसत्वाला मंजूरी दिली होती. शिंदे सरकारने हे निर्णय स्थगित केले असून नामांतराबाबत आता नव्याने निर्णय होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं होणार?

राज्यात पावसाचा जोर ओसरणार पण…; हवामान विभागाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

गळती थांबेनाच! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

“दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत, 165 आमदारांचं पाठबळ तरी… ”

ललित मोदी अन् अभिनेत्री सुष्मिता सेनचं झालं लग्न?, खासगी फोटो व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More