Top News महाराष्ट्र मुंबई

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री

मुंबई |  कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरु करताना स्थानिक जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करुन विद्यार्थ्यांचे आरोग्य शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरु होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासानाचा निर्णय अंतिम ठरणार आहे.

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून शाळा सुरु करताना स्थानिक प्रशासाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“कॉंग्रेस पूर्णपणे कोसळतेय; तिथे कुणीही माय-बाप उरला नाहीये!”

महाविकास आघाडी सरकार पलटूराम सरकार- देवेंद्र फडणवीस

विविध‌ योजनेअंतर्गत 5 लाख घरकुलांना मंजुरी देणार; हसन मुश्रीफांची घोषणा

दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढले- किशोरी पेडणेकर

“कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी पडतो, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या