Top News नाशिक महाराष्ट्र

महाविकासआघाडीतील अंतर्गत पक्षांतरावर छगन भुजबळ म्हणाले…

नाशिक |  सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश याबाबतच्या अनेक चर्चा सुरु आहे. यातच इतर पक्षातील नेते मंडळींना महाविकास आघाडीत प्रवेश देणार का असा सवाल पत्रकारांनी केला असता, महाअघाडीतील अंतर्गत पक्षांतराचा निर्णय तिन्ही पक्षाचे श्रेष्ठी घेणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ बोलतं होते. ते म्हणाले की, “बाळासाहेब सानप यांच्यासारखे अनेक जण राष्ट्रवादीत यायला इच्छुक असले तरी महाआघाडीतील पक्षांतराबाबतचा निर्णय हे संबंधित पक्षांचे पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत.”

पक्षांतराबाबत अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. अन्य पक्षांमधील नेते, पदाधिकारीदेखील राष्ट्रवादीत यायला इच्छुक आहेत, मात्र त्याबाबत आताच काही बोलणार नसल्याचेही भूजबळांनी सांगितलं.

दरम्यान,  पत्रकारांनी नाशिक महानगरपालिका निवडणूक महाआघाडीने एकत्रित लढवाणार का, असं विचारलं. त्याबाबतचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं छगन भूजबळ यांनी सांगितलं. प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना सर्व जागा लढवा, असे सांगत असले तरी त्यात काही चुकीचं नाही. कदाचित नाशिक मनपाची निवडणूक महाआघाडी एकत्रित लढवेल किंवा सर्व पक्ष स्वतंत्र लढून निवडणुकीनंतरही एकत्रित येऊ शकतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लवकरच भाजपला मोठी गळती, भाजपचे काही आमदार राष्ट्रावादीच्या वाटेवर- नवाब मलिक

“… तर 1000 कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी”

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये जाऊन काँग्रेसने लाचारी पत्करली”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद

‘भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच’; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या