बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांचा एक निर्णय, शिवसेना आमदार खूश, राष्ट्रवादीचा मंत्री नाराज!

मुंबई | उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यास सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी तीव्र विरोध केला होता. याच पाणी प्रश्नावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यानंतर आमदार शहाजी पाटील यांच्या तीव्र विरोधाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.

उजनी धरणातील सांडपाणी इंदापूरला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात मंत्रीमंडळाने 22 एप्रिलला एक पत्रक देखील काढलं होतं. इंदापूरला उजनीचं पाणी द्यावं अशी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची मागणी होती. यावरून सोलापूरचे आमदार नाराज झाले होते. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरचं पाणी पळवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत थेट शरद पवारांवर निशाणा साधला होता.

इंदापूरला 5 टीएमसी पाणी नेण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढला होता. हा आदेश तातडीने रद्द करा अन्यथा जिल्ह्यात रक्तरंजित आंदोलन करायची वेळ येईल, असा इशारा शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी दिला होता. तर शरद पवार राज्याचे नेते पण त्यांनी फक्त बारामतीचा विकास केला, असा आरोप देखील शहाजी पाटील यांनी केला होता.

दरम्यान, आमदार शहाजी पाटील यांच्या तीव्र विरोधाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी उजनी पाणी प्रश्नावर हा निर्णय घेतला आहे. इंदापूरला पाणी न दिल्याबद्दल इंदापूरच्या स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी उजनी धरणावर आंदोलन केलं.

थोडक्यात बातम्या-

फरार विजय माल्याची मालमत्ता आता SBI विकू शकणार; माल्याकडे 14 हजार कोटींची थकबाकी

कमरेला पदर खोचून आजीबाईंचा परफेक्ट बोलिंग नेम; पाहा व्हिडीओ

दैव बलवत्तर! भलंमोठं झाड कोसळल्यानंतरही वाचली महिला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

शरद पवारांचा सदानंद गौडा यांना पत्राद्वारे शाब्दिक टोला; म्हणाले…

निवृत्त झालेला Mr.360 पुन्हा मैदानात?; पुनरागमनाबाबत डिव्हिलियर्सने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More