बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अदानी समुहाचा ‘या’ तीन देशांना दणका! 3 हजार किलो ड्रग्ज सापडल्यानंतर घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली | अदानी समुहातील गुजरातमधील मुंब्रा बंदरावर सप्टेंबर 2021 रोजी 3 हजार किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्जसाठी जप्त केला. या कारवाईत 8 जणांना अटक करण्यात आली. त्यात अफगाणिस्तान आणि उझेबेकिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे. या कारवाईनंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अदानी समुहाने विविध देशांच्या मालवाहू जहाजांच्या प्रवेशबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

गुजरातमधील बंदरावर 3 हजार किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडल्यानंतर अदानी समुहाने निर्णय घेतला आहे. यामध्ये इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील मालवाहू जहाजांना 15 नोव्हेंबरपासून प्रवेश बंद केला आहे.

15 नोव्हेंबरपासून अदानी बंदर इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या जहाजांना बंदरावर प्रवेश देणार नाही. हा नियम अदानी समुहाकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व बंदरांना लागू असणार आहे. पुढील नोटीस येईपर्यंत या 3 देशांमधील जहाजांना अदानी पोर्टवर बंदी असेल, अशी माहिती अदानी समुहाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, कच्छ जिल्ह्यातील 16 सप्टेंबर रोजी मुंद्रा बंदरावर रोजी सापडलेलं ड्रग्ज हे मुळात अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात आलं होतं. इराणच्या बंदर अब्बास पोर्टवरून 2 कंटेनर भारतात पाठवण्यात आलं असल्याची माहिती महसुल गुप्तचर संचालनालयाने दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मला पक्षातून काढण्याची कोणाचीही हिंमत नाही, ही केवळ राजकीय लढाई”

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ तीन अर्थशास्त्रज्ञांना जाहीर!

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

लखीमपूर प्रकरणात आशिष मिश्राला न्यायालयाने दिली ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

“देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही; रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट सुरू आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More