बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबानला आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अमेरिका ‘अशी’ जिरवणार खोड!

काबूल | अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी पुर्णपणे कब्जा मिळवला आहे. तालिबानी आता अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन करणार आहेत. मात्र अशातच सर्वात शक्तीशाली राष्ट्र असलेल्या अमेरिकेने तालिबान्यांना मोठा झटका दिला आहे. नक्की अमेरिकेने तालिबावन्यांना कोणता झटका दिला आहे?, अमेरिकेने तालिबान्यांचं आर्थिकरित्या कंबरडं मोडलं आहे.

अमेरिकेच्या बँकांमध्ये अफगाण सरकारची 10 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मात्र आता ही संपत्ती अमेरिकेने सील केली आहे. त्यामुळे अमेरिकेने तालिबान्यांना मोठा आर्थिक झटका दिला आहे. देश चालवताना सरकारकडे नागरिकांना मूलभूत गरजा देताना शिक्षण आणि संरक्षण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पैशाची गरज लागते. मात्र पैसे सील केल्यामुळे तालिबानी कोंडीत पकडले गेले आहेत.

द अफगाणिस्तान बँक या देशाच्या शिखर बँकेची मोठ्या प्रमाणात संपत्ती परदेशामध्ये ठेवली आहे त्यामुळे ही संपत्ती मिळवणं तालिबान्यांसाठी अशक्य आहे. अमेरिकेने अशा प्रकारे तालिबानला गोचीत पकडलं आहे. तालिबानी काय करतात याकडे सर्व जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, एकीकडे तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे पहिले आणि माजी उपाध्यक्ष अमरूल्लाह सालेह यांनी स्वत: ला काळजावाही अध्यक्ष घोषीत केलं आहे. तालिबानला त्यांनी धुडकावलं असून तालिबानविरोधात लढा देण्यासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘तो’ टाईमपास आता बंद करा; उदयनराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

MG मोटर्सनं भारतात लाँच केली जबरदस्त गाडी, इच्यात जे ते कुणातच नाही!

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

…अन् राखी सावंत स्पायडर मॅनचा ड्रेस घालून झोपली रस्त्यात, पाहा व्हिडीओ

कोण आहेत तालिबानी? अफगाणी नागरीक का सोडतायेत देश? पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More