बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे जिल्ह्यातील कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली; प्रशासनाच्या चिंतेत भर

पुणे | महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या ही पुण्यात असल्याचं काही दिवसांपूर्वी स्पष्ट झालं होतं. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या कमी होत गेली. रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला होता.

पुणे जिल्ह्यातील कमी होणारी लोकसंख्या काल दिवसभरात मात्र वाढल्याचं भयावह चित्र पाहायला मिळालं. काल दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 9766 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनामुळे 131 जणांना आपला प्राण गमवावा लागला.

दिवसभरात एकूण 11 हजार 592 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रशासनाकडून रुग्णसंख्या कमी होत आहे, असं सांगितलं जात आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र रुग्णसंख्या ही वाढत असल्याचं चित्र पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता पुणेकरांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये अँटीजन चाचण्या होत नसल्याने रुग्णसंख्या घटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पूर्वी होणाऱ्या चाचण्यांपेक्षा आता चाचण्यांचं प्रमाण आता कमी झाल्यानेही रुग्णसंख्या काही दिवसांपासून आटोक्यात आल्याचं आभासी चित्र प्रशासनाकडून दाखवण्यात येत असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

थोडक्यात बातम्या –

धोनीच्या संघातील ‘हा’ खेळाडू बनणार भारतीय संघाचा नवा ऑलराऊंडर, घेणार हार्दिक पांड्याची जागा!

मनसे नेते अमित ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले…

“भर चौकात उभं नाही केलं तर माझं नाव रंजीत रंजन नाही”

100 वर्षांआधीचं ‘हे’ औषध ठरतयं ब्लॅक फंगसवर गुणकारी भारतीय डाॅक्टरचा दावा

फक्त एकच डोस पुरेसा!; ‘या’ लस उत्पादक कंपनीनं भारतासंदर्भात घेतला मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More