बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुस्तीत झालेला पराभव सहन झाला नाही; फोगट भगिनींच्या बहिणीनं उचललं धक्कादायक पाऊल

चंदीगड | दंगल गर्ल आणि कुस्तीपटू गीता आणि बबीता फोगट यांची मामे बहीण कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव स्विकारू शकली नाही. त्यामुळे तिने सोमवारी रात्री गळफास घेवून आत्महत्या केली आहे. तिने बलाली येथे राहणाऱ्या आपल्या काकांच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. संबंधित महिला कुस्तीपटू गेल्या अनेक वर्षांपासून आपले काका महाबीर पैलवान यांच्या घरी कुस्तीचा सराव करत होती.

कुस्तीपटू गीता आणि बबीता फोगाट यांच्या 17 वर्षीय मामे बहिणीचं नाव रितिका असून ती राजस्थानच्या झंझनू जिल्ह्यातील जैतपूर या गावातील रहिवासी आहे. मृत रितिका द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महाबीर पैलवान यांच्या कुस्ती अ‍ॅकॅडमीत गेल्या अनेक वर्षांपासून सराव करत होती. काही दिवसांपूर्वी रितिकाने भरतपूरच्या लोहागड स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभव स्विकारावा लागला.

सामनादरम्यान, स्टेडियममध्ये महाबीर फोगट देखील उपस्थित होते. अंतिम सामन्यात झालेला पराभव रितिकाच्या जिव्हारी लागल्याने तिने 15 मार्चला रात्री अकरा वाजता महाबीर फोगट यांच्या बलाली गावातील राहत्या घरात आत्महत्या केली आहे. तिने तिच्या खोलीतील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पैलवान रितिकाने 15 मार्चला रात्री अकरा वाजता घरातील एका खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यांनंतर मृतदेहावर दादरी येथील सिव्हील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून झोझू कलां पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्त केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“मर्सिडीज सोबत भाजप पदाधिकाऱ्याचा फोटो, भाजप नेते याचा खुलासा करतील का?”

महादेव जानकर पुन्हा पवारांना शह देण्याच्या तयारीत!

महिंद्रा जीप चालकाचा ‘हा’ प्रताप वाचून तूम्हीही व्हाल हैराण

‘एनआयए’चा मोठा खुलासा! CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच!

सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More