बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीची विजयी घोडदौड सुरूच; हैदराबादचा 8 गडी राखून पराभव

मुंबई | चालू आयपीएल हंगामातील 33वा सामना सनराईजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनराईजर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला आहे. त्याचबरोबर आता दिल्ली कॅपिटल्सचा संघ पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

प्रथम हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी कर्णधार केन विल्यम्सनचा निर्णय फेल ठरवला. दिल्लीच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत हैदराबादची टाॅप ऑर्डर मोडीस काढली. सर्वांच्या नजरा असलेला वाॅर्नरला भोपळा देखील फोडता आला नाही. मनिष पांडे, केदार जाधव, वृद्धीमान शाह देखील काही खास कामगिरी करू शकले नाही. अब्दूल समदच्या अखेरच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने 20 षटकात 134 धावा केल्या. दिल्लीकडून स्टाईक गोलंदाज कबिसो रबाडाने 3 बळी घेतले.

हैदराबादने दिलेल्या 135 धावांचं आव्हानचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात चांगली झाली. पृथ्वी शाॅ फटकेबाजी करण्याच्या नादात लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने दिल्लीची फलंदाजी संभाळली आणि दोघांनी आक्रमक खेळी सुरू केली. त्यावेळी शिखर धवनने 42 धावा केल्या आणि अखेर श्रेयस अय्यर आणि कर्णधार रिषभ पंतने सामना जिंकून दिला. 13 चेंडू राखून दिल्लीने हा सामना जिंकला आहे.

दरम्यान, शिखर धवनने 42 धावांची खेळी करत ऑरेंज कॅप होल्डर ठरला आहे. त्याचबरोबर दिल्ली पुन्हा 14 अंकासाठी गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचली आहे. सनराईजर्स हैदराबादचा गोलंदाज टी नटराजन कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानंतर आजचा सामना होईल की नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, अखेर हा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला होता.

थोडक्यात बातम्या-

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

‘काम कोणाचं आणि नाचतंय कोण? कधीतरी खरं बोला’; दोन राजेंमध्ये पोस्टर’वाॅर’

‘तुम्ही माझ्या पाया नका पडू, मीच तुमच्या पडतो’; ‘या’ मराठमोळ्या कलाकारासमोर झुकले महानायक!

महिला सुरक्षेबाबत नाना पटोलेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

“प्रभू श्रीराम एक महापुरूष होते हे मी मानत नाही”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More