बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीची दंगल अचानकपणे घडली नव्हती, तर…; दिल्ली न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या हद्दीला लागून असलेल्या दिल्लीच्या ईशान्य भागात फेब्रुवारी 2020 मध्ये हिंदू-मुस्लिम दंगल पेटली होती. त्या दंगलीमध्ये मोठ्या प्रामाणात आर्थिक आणि जीवितहानी झाली होती. या दंगलीनंतर अनेकांना पोलिसांनी अटक केली होती. दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

फेब्रुवारीमध्ये दिल्लीच्या दंगलीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या व्हिडीओमध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही जमावांच्या लोकांच्या हातांमध्ये लाठ्या दगड दिसत होते. त्या दंगलीतील मुख्य आरोपी मोहम्मद इब्राहिमला न्यायालयाने जामीन नाकारला आहे. यावर दंगलखोरांनी शहरातील अनेक ठिकाणांवर लावलेले सीसीटीव्ही बंद केले होते. त्यावरून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या पूर्वनियोजित कटाची खात्री पटली. दंगलखोरांनी पोलीस अधिकाऱ्यांवरही लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली. ही दंगल अचानकपणे घडली नव्हती, तर हा एक मोठा पूर्वनियोजित कट होता, असं दिल्ली न्यायालयाने म्हटलं आहे.

दिल्ली दंगलीच्या वेळी आरोपी मोहम्मद इब्राहिमने दंगलीत तलवार वापरली होती. त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप मोहम्मद इब्राहिमवर लावण्यात आला आहे. परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यू झालेल्या रतनलालचा तलवारीने मृत्यू झाला नाही, असं इब्राहिमच्या वकिलांनी न्यायलायात दावा केला आहे. यावर बोलताना वकिलांनी सांगितलं आहे की, इब्राहिमने त्याच्या कुटुंबाची सुरक्षा करण्यासाठी तलवार उचलली होती.

दरम्यान, इब्राहिमने तलवार उचचली होती. तलवारीमुळे एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत किंवा मृत्यृ होऊ शकतो, अशा शस्त्राचा वापर इब्राहिमने केला, असं न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं आहे. त्यामुळे त्याला न्यायालयाने जामीन देण्यास नाकारला होता.

थोडक्यात बातम्या-

“आमच्या सरकारमध्ये मोबाईल वाजला तर शेतकऱ्यांना वाटायचं मदत आली”

“पंतप्रधान मोदींनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला मदत जाहीर करावी”

‘एका पार्टीला मी 2 लाख खर्च करतो, तर 10 लाखांसाठी…’; फिक्सिंगच्या आरोपावर श्रीसंतने सोडलं मौन!

#Breaking पंजाब काँग्रेसला मोठा धक्का! नवज्योतसिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मराठवाड्यात पावसाचं थैमान! 35 जणांचा मृत्यू तर 20 लाख हेक्टर शेतीचं नुकसान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More