बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असलेला डेल्टा व्हेरीएंट आता डेल्टा प्लसमध्ये बदलला, भारताला धोका किती?

नवी दिल्ली | भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला होता. तसेच रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, भारतातील दुसऱ्या लाटेला जबाबदार असलेल्या डेल्टा व्हेरीएंटने आता रौद्र रूप प्राप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

भारतात डेल्टा प्लस हा कोरोना व्हेरीएंट सध्या सक्रिय झाला असून त्याचे अद्याप जास्त रुग्ण देशात आढळून आलेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी या व्हेरीएंटचा धोका भारतीयांना कमीच असल्याचं शास्त्रज्ञांनी बोलून दाखवलं आहे. भारतात आता मोनोक्लोनल अँटीबॉडी काँकटेल उपचार पद्धतीला परवानगी मिळाली आहे.

दिल्लीतील इन्स्टिट्यूट आयजीआयबीचे शास्त्रज्ञ विनोद स्कारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, के-417 एन याच्या परिवर्तनामुळेच बी 1.617.2 हा कोरोनाचा व्हेरीएंट बनला आहे. तसेच याला एवाय.1 या नावानेही ओळखलं जातं. सध्या भारतात या व्हेरीएंटची प्रकरणं कमी प्रमाणात आहेत. अशी माहिती स्कारिया यांनी दिली आहे.

युरोप, आशिया आणि अमेरिकेतून के 417 एन ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात व मुख्यतः समोर आली आहेत. तसेच कोरोना व्हेरिएंटमध्ये झालेला बदल हा प्रतिकारशक्तीशी देखील निगडित असू शकतो, असा अंदाज व्यक्त करत या विषाणूमुळे अँटीबॉडी कॉकटेल उपचाराला जरी फटका बसला असेल तरी हा जास्त घातक नसल्याचं मत विनोद स्कारीया यांनी व्यक्त केलं आहे. याची चाचणी करून त्याच्या संक्रमन क्षमतेची आणि प्रसार होण्याच्या क्षमतेची माहिती घेणं गरजेचं असल्याचं मत पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेतील प्राध्यापकांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

विजय वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांवर नाराज? भर पत्रकार परिषदेत व्यक्त केली नाराजी

“जनता भाजपला कंटाळली असून आता काँग्रेस हाच भाजपला एकमेव पर्याय”

महाराष्ट्रातील कोणत्या महापालिका सध्या अनलॉकच्या कोणत्या स्तरामध्ये आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोसह निकृष्ट फीड देणाऱ्या कंपनीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More