बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाळी साडेसात वाजता हिंदूजा रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे. माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबियाबरोबर, मित्रांबरोबर आणि असंख्य प्रशंसकांसोबत आहेत, देव त्यांच्या आत्मास शांती देवो, असं मोदींनी म्हटलं आहे.

चित्रपट सृष्टीमधील महान व्यक्ती म्हणून दिलीप कुमार यांची कायम आठवण काठली जाईल. चित्रपटांमध्ये वावरताना त्यांचं तेज अतुलनीय होतं. त्यामुळेच त्यांनी अनेक पिढ्यांमधील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील.

थोडक्यात बातम्या- 

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना सर्वात मोठा दणका!

‘फडतूस माणसांबद्दल मी बोलत नाही’; भास्कर जाधवांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

विधिमंडळातील हे 12 सदस्य उत्कृष्ट संसदपटू, भाषण पुरस्कारांनी सन्मानित!

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘या’ वयोगटातील लोकांना डेल्टा व्हेरियंटचा सर्वाधिक धोका; महत्वाची माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More