मुंबई | आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी यंत्र पुरवणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा संकलनाची सुविधा होणार असल्याचं देखील टोपे यांनी सांगितलं.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा होणार आहे. जगात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले जातात. मात्र महाराष्ट्र पहिले राज्य आहे, जेथे सौम्य तसेच गंभीर रुग्णांवर या थेरपीने उपचार केले जात आहेत.
ज्या १० ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही तेथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहे. हा संकलित केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाईल. प्लाझ्मा थेरपी उपचार यशस्विता दर हा 90 टक्के आहे. त्यामुळे आता जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांनी अन्य रुग्णांसाठी प्लाझ्मा देण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनामुक्त झालेले रुग्ण आता संकटमोचक म्हणून प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून पुढे येत आहेत. जगातली सर्वांत मोठी ट्रायल थेरपी केंद्र राज्याच्या उपराजधानीत म्हणजे नागपुरात सुरू केले आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाच्या संकटात सामान्य माणसाला इंधन दरवाढीचा शॉक नको- मायावती
विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाच्या उपचारात महाराष्ट्र जगाच्या पुढे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जगातला सगळ्यात मोठा प्लाझ्मा ट्रायल प्रोजेक्ट, उद्धव ठाकरेंनी केली घोषणा
शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी