पुणे महाराष्ट्र

‘पंतप्रधान माझ्याशी घरातल्या व्यक्तीसारखे बोलले’; चाकणच्या महिला सरपंचांनी साधला मोदींशी संवाद

पुणे | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिनानिमित्त देशभरातील काही निवडक सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यात चाकणच्या मेदनकरवाडी येथील सरपंच प्रियंका मेदनकर-चौधरी यांचा ही समावेश होता.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याची संधी मिळू शकते, असा फोन झेडपीमधून सरपंच प्रियंका यांना आला होता. त्यानंतर गुरुवारी महाराष्ट्रातून एकमेव प्रियांका यांची निवड झाल्याचं दिल्लीहून फोनद्वारे सांगण्यात आणि आज अकराच्या सुमारास तयार राहण्यास सांगितलं.

देशाच्या पंतप्रधानांशी बोलायचं असल्याने अगोदर खूप दडपण आलं होतं. रात्रभर झोप लागली नव्हती. पण नरेंद्र मोदी घरातल्या व्यक्तीप्रमाणं माझ्याशी बोलले, असं प्रियंका यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याची खूप इच्छा होती. ती इच्छा आज पूर्ण झाली आहे, असं प्रियांका यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ

‘भारतीय मनाने कणखर असून त्यांचं मनोबलच कोरोनावर मात करेल’; चीनमधील तज्ञांकडून कौतुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या