बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron नंतर ‘या’ नव्या व्हेरियंटचा शोध, ओमिक्रॉन, कोरोनापेक्षाही भयावह

नवी दिल्ली | भारतासह इतर अनेक देशात कोरोना विषाणूने (Corona Virus) हाहाकार माजवला आहे. त्यातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनने (Omicron Varient) देखील चिंता वाढवली आहे. अशातच आता अजून एका नवीन व्हेरीयंटचा शोध लागला असून या व्हेरियंटने 46 वेळा रुप बदलले आहे.

फ्रान्समध्ये व्हेरियंट आयएचयू (Varient IHU) या नवीन व्हेरियंटचा शोध लागला आहे. या व्हेरियंटची लागण झालेले 12 रुग्ण आत्तापर्यंत फ्रान्समध्ये सापडले आहेत. हे सर्व लोक कॅमेरून देशातून परतले आहेत. मात्र, हा व्हेरियंट वेगाने पसरत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.

मेडिटेरेनी इन्फेक्शन फाऊंडेशनने 10 डिसेंबरला व्हेरियंट आयएचयूचा शोध घेतला होता. हा व्हेरियंट अन्य देशांमध्ये पसरला आहे का? याचा शोध सध्या सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटना इन्व्हेस्टिगेशनचा टॅग लावून तपास करणार आहे. या व्हेरियंट अधिक ताकदीचा असू शकतो, त्यामुळे त्यावर लसीचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, सध्या फ्रान्समध्ये ओमिक्रॉनने दहशत माजवली आहे. कोरोना झालेल्या रुग्णापैंकी 60 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. त्यामुळे फ्रान्स प्रशासानाची चिंता वाढली आहे. त्यातचं नवीन व्हेरियंटचा शोध लागल्याने सध्या देशात भीतीचं वातावरण आहे.

थोडक्यात बातम्या-

ओबींसींबाबत जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

धक्कादायक! लस घेतलेल्या ‘इतक्या’ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

नितेश राणेंना मोठा दिलासा; तुर्तास अटक होणार नाही

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

मुंबईत लागणार लॉकडाऊन?; आयुक्तांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More