बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 कोटीचे मालक झालेच कसे?”

मुंबई | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने करत आहेत. परंतु आता महाविकास आघाडीतील नेते एकमेकांनावर भ्रष्टाचाराचे आरोप करतना दिसत आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापत आहे. यातच आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातला वाद विकोपाला पोहोचला आहे.

भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 कोटीचे मालक कसे झालेत. भुजबळांनी अधिकार नसताना निधीचं वाटप केलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडील असलेलं पालकमंत्रिपद काढून घ्या, अशी मागणी सुहास कांदे यांनी केली आहे.

भुजबळ हे केवळ भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थीच नाही तर प्राचार्य आहेत. भुजबळांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. हे पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. गुन्हेगार कधीच गुन्हा केला नाही हेच सांगत असतो, असंही कांदे यांनी सांगितलं.

दरम्यान,  छगन भुजबळांनी निधी विकल्याचे 500 पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार कांदे यांनी केला आहे. त्यामुळे सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यात पुढे काय राजकीय घडामोडी घडणार हे आता पाहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

दोन जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी आम्हाला…’; मनसे-भाजप युतीबाबत नानांचं मोठं वक्तव्य!

“कन्हैया कुमार म्हणजे रंग बदलणारा सरडा, तो भाजपमध्येही जाऊ शकतो”

“कॅप्टन अमरिंदर सिंग यांना केंद्रात मंत्रिमंडळात लॉटरी लागण्याची शक्यता, लवकरच घेणार मोदींची भेट”

“सुप्रिया ताई जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?”

आलिया भट्टने केला हिंदू संस्कृतीचा अपमान??? मुंबईत आलियाविरूद्ध तक्रार दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More