बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जेवणानंतर खाल्लेले अन्न पचत नाही?; मग वाचा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक उपाय

मुंबई | मसालेदार तळलेले आणि पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकांना पोटाच्या समस्यांना समोरं जाव लागतं. मसालेदार आणि तळलेल्या अन्न पदार्थांवर नियत्रंण नसल्याने आपल्याला पोटाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी पोटाचा त्रास दूर कसा करावा, याबद्दल आयुर्वेद डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

तुप, गरम पाणी आणि मीठ हे एकत्र करून प्यायल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. तूप आपल्या आतड्यांत चिकटपणा आणण्याचे काम तर मीठ आतड्यांतील बॅक्टेरिया साफ करते. त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली बनते, असा सल्ला आयुर्वेद आणि न्यूरोथेरपीच्या डॉक्टर मीनल देशपांडे यांनी दिला आहे.

पोट साफ न होणे, अॅसीडिटी, गॅस होणे, अपचन, पोट फुगणे यांसारख्या समस्यांवर आयुर्वेदीक घरगुती पद्धतीने उपाय केले पाहिजेत. रात्री जेवणानंतर बडीशेप खाणे,  तुळशीची पाने खाणे, तसेच नारळाचं पाणी पिणे, यासारखे उपाय केल्यावर तुम्हाला समस्यांना समोरे जावं लागणार नाही, असं डॉ. शीतल तन्ना म्हणतात.

दरम्यान, सुप, करी आणि भात इत्यादी पदार्थसोबत दूधीच्या भाजीचं सेवन केल्यामुळे डायरियाच्या समस्यावर तुम्ही विजय मिळवू शकता. दुग्धजन्य पदार्थ, कच्चा भाज्यांपासून बनवलेले सुप पिल्याने तुम्ही इनडायजेनशनच्या समस्यावर मात करू शकता, असं डॉक्टर लिनिशा यांनी म्हटलं आहे.

पाहा पोस्ट-

थोडक्यात बातम्या- 

“सगळे चोर आहेत, फक्त जरंडेश्वरलाच का टार्गेट केलं जातंय?”

नवाब मलिक म्हणतात, “मला राजस्थानमधून धमकीचा फोन येतोय, समीर वानखेडेंना…”

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांनी सोडलं मौन, मांडली जरंडेश्वरची कुंडली

1 नोव्हेंबरपासून व्हॅट्सअॅप होणार बंद, ‘या’ अँड्राॅइड फोनवर व्हाॅट्सअ‌ॅप होणार बंद

काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पंजाबच्या राजकीय मैदानात आता ‘हा’ पक्ष करणार एन्ट्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More