बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुक्त झालेल्या महिलेला उद्भवली ही समस्या; डॉक्टरही झाले हैराण

नवी दिल्ली | कोरोना फक्त फुफ्फुस नाही तर इतर अवयवांवरही गंभीर परिणाम करत असल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुक्त झालेल्या एका 48 वर्षाच्या महिलेच्या पित्ताशयाला सूज आली आहे. यानंतर डॉक्टरही हैराण झालेत.

या महिलेला पित्ताशयासंबंधी कोणताही आजार नव्हता. कोरोनाशी लढा दिल्यानंतर आरोग्यासंबंधी उद्भवलेली ही पहिली समस्या नाही. याआधी काही रुग्णांना गँगरिनही झाला आहे, असं दिल्लीच्या मूलचंद मेडसिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितलं. ते टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.

पाटणा एम्समध्ये कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात अनेकलोक शुगर लेव्हल वाढणं, थकवा, डोकेदुखी अशा अनेक समस्यांना सामोरं जात आहेत.

दरम्यान, कोरोनाव्हायरसनंतर म्युकरमायकोसिस, बोन डेथ आणि आता ग्रीन फंगसचे  रुग्ण सापडले आहेत. मुंबईत ग्रीन फंगस म्हणजे हिरव्या बुरशीचे रुग्ण आढळून आले आहेत. केईएममध्ये आतापर्यंत 8 रुग्णांवर उपचार झाले. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना ग्रीन फंगसची लागण झाली आहे.

थोडक्यात बतम्या- 

“तुमची गाडी पेट्रोल, डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं”

‘भास्कर जाधव यांनीच आईवरुन शिवी दिली’; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

“काल त्यांनी प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील”

जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता- असीम सरोदे

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 9 हजारांनी वाढ, कोरोनाबळी पुन्हा नऊशेपार

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More