बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रूग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करणाऱ्या डाॅक्टराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई | कोरोनाकाळात फक्त एका दिवसात कोविड रुग्णाला बरं करण्याचा दावा वांगणी येथील डाॅ. उमाशंकर गुप्ता यांनी केला होता. याबाबतचा एक व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मीडियावरुन व्हायरल केला होता. व्हिडीओमध्ये त्यांनी कोविड रुग्ण दोन दिवसात बरे होऊ शकतात, असा दावा केला होता. या डाॅक्टरला आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

संबंधित डाॅक्टर हे वांगणी येथे शिल्पा नावाचे खाजगी रुग्णालय चालवत होते. त्यांच्याकडे असलेल्या औषधांमार्फत ते कोविड रुग्णाला उपचार देत असून ते होमिओपॅथी पद्धतीने उपचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. याबाबत व्हायरल झालेल्या डाॅक्टरांच्या व्हिडीओची दखल घेत अंबरनाथ तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुनिल बनसोडे यांनी डाॅ. गुप्ता यांच्या विरोधात बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

दरम्यान, विनापरवानगी डाॅ.गुप्ता क्लिनीक चालवत असून कोरोना नियमांचे पालन करत नसल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. उपचारादरम्यान डाॅ. गुप्ता मास्कचा वापर देखील करत नव्हते, तसेच रुग्णांना देखील मास्क न लावल्यास चालेल असा सल्ला देत होते.

दरम्यान, या संपुर्ण प्रकरणानंतर तसेच गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अखेर डाॅ. गुप्ता यांना बेड्या ठोकल्या. डाॅ. गुप्ता यांना न्यायालयात देखील हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ शहरात पसरलेल्या अफवेमुळे पेट्रोल पंपाचा साठा चक्क एका दिवसात पुर्णपणे संपला

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ, मृत होणाऱ्यांची संख्याही वाढली

कोरोना रूग्णांसाठी वेबसाईट बनवणाऱ्या दहावीच्या मुलाला महापौरांनी दिली शाबासकीची थाप

पुणे पोलिसांनी वर्षभरात तब्बल एवढ्या पुणेकरांवर केली मास्क न वापरल्याबद्दल कारवाई

श्रीलंका दौऱ्यात हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार?, अजूनही एका नावाची चर्चा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More