बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आईच्या अंगावर कुत्रा भुंकला, तरुणीला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना!

पुणे | पुुण्यातील कोथरुड भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणीने ज्या कुत्र्याला खायला घातले ते कुत्रं आपल्या आईच्या अंगावर भुंकल्याने चौघांनी मिळून त्या तरुणीला जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निशा पंडित थरकुडे या म्हातोबानगर, कोथरुड येथे राहतात. निशा यांनी रात्रीच्या सुमारास एका कुत्र्याला खायला घातले होते. तो कुत्रा निशा यांच्या घराशेजारी राहणाऱ्या राजाराम चौधरी यांची आई मालुबाई चौधरी यांच्या अंगावर भुंकला.

आईच्या अंगावर कुत्रा भुंकल्याने राजाराम चौधरी यांच्यासह त्यांची आई मालुबाई चौधरी, पत्नी बायडा चौधरी आणि मंदाकिनी चौधरी यांनी मिळून निशा यांना जबर मारहाण केली. चौघा आरोपींनी निशा यांना शिवीगाळ करत त्यांच्या हाताचे बोट पकडून जोरात वाकवले. यामुळे निशा यांना दुखापत झाली आहे.

दरम्यान, फिर्यादीचे शारिरीक व आर्थिक नुकसान झाल्याप्रकरणी, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण याप्रकरणी तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

…तर मीराबाई चानूलाही मिळू शकतं सुवर्णपदक; जाणून घ्या नेमकं कसं!

भास्कर जाधवांच्या त्या वर्तनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दाैरा रद्द; विशेष विमानाने मातोश्रीकडे रवाना

तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयला पुणे पोलिसांनी दिलं चांगलंच बड्डे गिफ्ट!

“मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौऱ्यावर खादीचा कुर्ता घातलेला बाऊन्सर नेला होता काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More