Top News देश

कुत्र्याच्या साखळीने गळा आवळला; हत्येचं कारण ऐकून सुन्न व्हाल!

मध्य प्रदेश | मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपआपसातील वादामुळं पतीने पत्नीची हत्या केली असल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

लॉकडाऊनच्याकाळात एक तरुण-तरुणी प्रेमात पडले. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांचं लग्न झालं. यानंतर ऑक्टोबर महिन्यात या दोघांमधील वाद इतका वाढला. यामुळं मंगळवारी रात्री पतीने कुत्र्याच्या साखळीने पत्नीची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा त्याला जमलं नाही. तेव्हा त्याने सुऱ्याने पत्नीची हत्या केली. यानंतर आरोपी पतीने स्वत: इंदूरमधील संयोगितागंज पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला.

मृत महिलेच वय 22 वर्षे होतं. मृत महिलेचे कुटुंबीय तिचा पती व त्याच्या कुटुंबीयांवर आरोप लावत आहेत. याशिवाय पोलीस सासरच्या दबावामुळे कारवाई करीत नसल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, संयोगितागंज पोलिसांनी मृत तरुणीचे शव पोस्टमार्टमसाठी दिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

थोडक्यात बातम्या

‘…त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठं तोंड लपविणार?’; गुरूवाणीचा अर्थ सांगत मोदींवर निशाणा

“कोरोनाने सांगितलं आहे का मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल”

…तर ‘त्या’ खाजगी प्रयोगशाळांची मान्यता होणार रद्द- महापौर

कोरोना विषाणूचे दुष्परिणाम वाढले; ‘या’ रूग्णांनी काळजी घ्यावी

‘केंद्राचं पथक आत्ता राज्यात म्हणजे ‘पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं’; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या