पुणे महाराष्ट्र

‘आज शिर्डीतील ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच’ तृप्ती देसाईंचा निर्धार

पुणे | शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड म्हणजेच भारतीय पोशाखात येण्यासाठीचा बोर्ड लावण्यात आला आहे. यावर आज तो सक्तीचा बोर्ड काढणार असा निर्धार भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तुप्ती देसाईंनी पुण्यात बोलून दाखवला आहे.

ड्रेसकोडची सक्ती करण्यात आल्यामुळे तृप्ती देसाईंनी त्यावर तृप्ती देसाईंनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर 11 डिसेंबरपर्यंत शिर्डीत प्रवेशबंदी केली होती. मात्र त्यांनी आज आपण शिर्डीकडे जाणार असल्याचं म्हटलं आहे.

शिर्डीत जाऊन तो बोर्ड आपण काढणारच, तुप्ती देसाईंनी केलेल्या या दाव्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिर्डीतील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, शिर्डी मंदिरातसुद्धा पुजारी अर्धनग्न अवस्थेत असतात. यावर अर्धनग्न पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही असा बोर्ड भक्तांनी कधीही लावलेला नाही, असं तुप्ती देसाईंनी म्हटलं होतं. त्यामुळे आता शिर्डीत तृप्ती देसाई जाऊन बोर्ड काढतात की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आधीच स्क्रिनवर 15 सेकंदाचा रिप्ले दाखवणं महागात पडलं; ‘त्या’ निर्णयावर कोहली नाराज

कोरोना लसीबाबतची ‘ती’ बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट

“…तर भाजपला राज्यात 50 पेक्षा जास्त जिंकता लढवता येणार नाही”

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रिम कोर्टचा नकार, ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या