Top News पुणे महाराष्ट्र

धक्कादायक! हॅार्न वाजवल्याचा राग आल्याने चालकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

पुणे | पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवनेरी बसच्या चालकानं हॅार्न वाजवल्याचा राग आल्यामुळं 3 युवकांनी मिळुन चालकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी केलं.

रात्री सव्वा अकराच्या सुमारास बस चालक अमोल गायकवाड शिवनेरी बस घेऊन चालले होते. मालधक्का चौकात आल्यावर अमोलनं बसचा हॅार्न वाजवला. त्याचा राग आल्यामुळं तीन युवकांनी बस अडवून अमोल यांना हॅार्न का वाजवला असं विचारत त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली.

याप्रकरणी अमोल यांनी या तीन आरोपींविरोधात बंडगार्डन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या तीन अरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

बॅालिवूड सिनेसृष्टीला आणखी एक धक्का; ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं दुख:द निधन

‘तुम्ही भाषा बदलली नाही तर…’; निलेश राणेंचा राऊतांना इशारा

“मंगेशकर असोत की तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे”

‘याला चिंधी बाजार म्हणतात साहेब’, निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदी आम्हाला घाबारतात, हे त्यांना शोभत नाही- योगेंद्र यादव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या