महाराष्ट्र मुंबई

पगार न मिळाल्याने संतापलेल्या ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस पेटवल्या!

मुंबई | बोरिवलीत पाच लक्झरी बसेसला आग लागली होती. या आगीत या पाचही लक्झरी बसेस जळून खाक झाल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज होता. मात्र तपास केल्यानंतर ड्रायव्हरनेच बसेस पेटवल्याचं समोर आल आहे.

पगार न मिळाल्याने ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस जाळल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमएचबी पोलिसांनी बसच्या चालक अजय रामपाल सारस्वतला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची चौकशी केली. त्यावेळी त्यानेच बसेसला आग लावल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, अजय रामपाल सारस्वतला पोलिसांनी अटक केली आहे. या पाचही बसेसची किंमत सुमारे 3 कोटी 30 लाख रुपये इतकी आहे.

थोडक्यात बातम्या-

‘नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा लावावा’; संभाजी भिंडेंची मागणी

देशाला किमान चार राजधान्या हव्यात- ममता बॅनर्जी

26 जानेवारीपासून येरवडा कारागृहात ‘जेल-पर्यटन’ सुरु होणार- अनिल देशमुख

या देशाला भारत नाही, हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे- संभाजी भिडे

‘लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नाही’; पंकजा मुंडे हवा बदलासाठी महाबळेश्वरमध्ये

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या