बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पीपीई किट घालून ड्रायव्हर वरातीत नाचला; व्हिडीओ तुफान व्हायरल

देहरादून |  कोरोनाच्या संकटात लोकांच्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनावर मोठा परिणाम होतं आहे. हा ताणतणाव दुर करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात. अशीच एक घटना उत्तरराखंडमधील हल्द्वानीमध्ये घडली आहे.  उत्तरराखंडात हल्द्वानी शहरातील मेडिकल कॉलेजच्या बँड बाजासह एक व्यक्ती पीपीई किटमध्ये नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पीपीई किटमध्ये डान्स करणारा हा व्यक्ती रुग्णवाहिकेचा चालक असल्याचं कळतं आहे.

वरात हॉस्पिटलच्या बाजूने जात होती.तेव्हा हा चालक बँड बाजाचा आवाज ऐकताच त्या ठिकाणी जाऊन नाचायला लागला. रुग्णवाहिकेचा चालक वरातील शिरल्यावर प्रथम त्याठिकाणी उपस्थित असलेली सर्वजण घाबरली. त्याला पाहून माणसं आश्चर्यचकित झाली. पण नंतर लोकांनी त्याच्या डान्सचा आनंद लुटला. त्यानंतर लोकांना तो कोण आहे हे कळलं. शेजारी असलेल्या मेडिकल दुकानदाराने हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. मिळालेल्या माहितीनुसार या चालकाचं नाव महेश असल्याचं सांगण्यात येतंय.

ज्यावेळी लग्नाची वरात हॉस्पिटल शेजारून जात होती. तेव्हा तेव्हा रुग्णवाहिकेच्या चालकाने तणाव दूर करण्यासाठी बँड बाजा सुरू असताना तेथे पोहचला आणि डान्स करू लागला. त्याच्या या डान्सवर सोशल मीडियावर खूप कमेंट्स आल्या आहेत. काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही लोक याला असंवेदनशील म्हणत आहेत. तर काही लोकांनी चालकाच्या कृत्याला पसंती दर्शवली आहे. कामाचा तणाव दूर करण्यासठी हा चांगला पर्याय आहे, असं काहींच म्हणणं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या कठिण काळात रूग्णांच्या नातेवाईकांवर मोठं संकट आलं आहे. त्याचसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांवर देखील कामाचा मोठा ताण आहे. कामाचा वाढलेला ताण कमी करण्यासाठी आणि मनावरचा ताण कमी करण्यासाठी रुग्णवाहिकेचा चालकानं केलं असावं.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या-

परभणीत नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; जिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजन गळती

यॉर्कर राज सिराज! अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूचा अवघ्या एका धावेने विजय

भारत बायटेकने जाहीर केली लसीची किंमत; सीरमची लस स्वस्त की भारत बायटेकची?, जाणून घ्या 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूंचं कोरोनामुळे निधन

“मेच्या ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्राला लस पुरवता येणार नाही, मोदी सरकारनं स्टॉक बुक केला आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More