बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐकावं ते नवलचं! ट्रकमध्ये हेल्मेट नाही घातलं म्हणुन चालकाला तब्बल एवढा दंड!

भुवनेश्वर | परिवहन विभागाचा अजब कारभार ओडिशामध्ये समोर आला आहे. प्रमोद कुमार नावाच्या ट्रक चालकाला ट्रकमध्ये हेल्मेट न घातल्याने एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रमोद कुमार याला या गोष्टीची माहितीही नव्हती. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

गंजम परिवहन कार्यालयात वाहनाच्या परमिट नूतनीकरण करण्यासाठी गेल्यानंतर त्याला तुझ्या गाडीवर एक हजार रुपयांचा दंड बाकी असल्याचं अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं. एक हजार रुपयांचे चलन नेमके कशाचे आहे याचं स्पष्टीकरण विचारल्यानंतर, OR-07W/4593 या गाडीवर हेल्मेट न घातल्याने एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचं त्याला सांगण्यात आलं.

वाहतूक विभागाने दिलेल्या गाडीचा नंबर हा एका ट्रकचा नंबर असल्याने प्रमोद कुमार याला ट्रक मध्ये हेल्मेट न घातल्याने एक हजार रुपयांचा दंड वाहतूक विभागाकडून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. प्रमोदने ही गोष्ट अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. पण अधिकाऱ्यांनी त्याचं न ऐकता एक हजार रुपयांचा दंड भरल्यानंतरच परमिट नूतनीकरण होईल असं त्याला सांगितलं.

नाइलाजाने प्रमोद कुमार या ट्रक चालकाने ट्रकमध्ये हेल्मेट न घातल्याचा एक हजार रुपयांचा दंड भरून आपलं परमिट नूतनीकरण करून घेतलं. त्यानंतर त्याने माध्यमांशी बोलून वाहतूक विभागातील अधिकारी विनाकारण त्रास देऊन लोकांकडून पैसे गोळा करत आहेत. यासंदर्भात सरकारने पाऊले उचलण्याची गरज असल्याचं सांगितलं.

दंडाची पावती – 

थोडक्यात बातम्या –

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र व्यक्ती”

नुसता झगमगाट!!! ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

‘मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा”

महाराष्ट्रातील आवडता नेता कोण?, सोनू सूद म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More