बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चालकाच्या धाडसाने प्रवाशांचा जीव धोक्यात, पुलावरून जाताना एसटी कोसळली; पाहा व्हिडीओ

यवतमाळ | गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला असून नद्या ओसांडून वाहत आहेत. यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच यवतमाळ येथे मुसळधार पावसात एसटी बस थेट पाण्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे.

नागपूरवरुन नांदेडकडे जाणाऱ्या एसटीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. नदीवरून पाणी वाहत असताना देखील एसटी चालकाने धाडस करत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. पुलावरून पाणी वाहत असतानाही चालकाने पाण्यातून गाडी नेली आणि पाण्याचा प्रभाव जास्त असल्याने बस वाहून गेली.

या अपघाताचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये पुलावर पाणी वाहत असताना दिसत आहे तर एसटी चालकाने बस पुलावरून नेत असतानाच अचानक पाण्यात कोसळली. या बसमध्ये 22 कर्मचारी होते. यातील काही लोक बसच्या टपावर मदतीची हाक देत बसलेले व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, घटनास्थळी मोठ्या वेगाने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू आहेत. तीन प्रवाशांना आतापर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात आले असून बसचालक आणि इतर प्रवाश्यांची माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा व्हिडीओः 

थोडक्यात बातम्या-

“तुमचं आमचं स्वप्न पुर्ण करायचंय, 2024 ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल”

‘शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज’; हसन मुश्रीफ यांची घोषणा

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! गुलाब चक्रीवादळामुळे ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

“मी खूप नशिबवान, कोरोनामुळे माझा जीव वाचला”

…तर मग कर्णधारची गरजच काय?; KKRच्या ‘त्या’ कृतीवर गौतम गंभीर भडकला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More