बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने अनन्याच्या हातून बिग बजेट सिनेमे जाणार?

मुंबई | ड्रग्ज प्रकरणात 26 दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर आर्यन खानला अखेर काल जामीन मिळाला. आर्यन खानला जरी दिलासा मिळाला असला तरी व्हॉट्सअॅप चॅटमुळे या प्रकरणात नाव आलेल्या अनन्या पांडेच्या मात्र अडचणी वाढल्या आहेत. तिच्या करिअरवर याचा वाईट परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात नाव आल्याने अनन्या पांडेच्या हातून अनेक चांगल्या ऑफर्स निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनन्याकडे सध्या लॅकमे, ओन्ली, जिलेट, पर्क चॉकलेट या ब्रँडच्या जाहिराती आहेत. मात्र आता ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने लोकांनी जर या प्रोडक्ट्सवर बहिष्कार घालायचं ठरवलं. तर कंपनीचं फार मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे आता हे सर्व ब्रँड हे त्यांचं नुकसान स्विकारणार नाहीत. त्यामुळेच अर्थात अनन्याकडून या ब्रँड्सची जाहिरात जाऊ शकते.

यापूर्वीच अनन्याने अनेक बिग बजेट चित्रपट साइन केलेले आहेत. मात्र, आता डायरेक्टर्सची अनन्याबाबतची भीती वाढली आहे. कारण चित्रपटाच्या डायरेक्टर्सनाही ड्रग प्रकरणामुळे लोक अनन्याचा चित्रपट नाकारतील अशी शंका वाटत आहे. शिवाय अजूनही अनन्याची चौकशी सुरूच आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार?, यावरून अनन्याला चित्रपटाच्या शुटींगचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

सध्या अनन्याकडे लायगर हा बिग बजेट सिनेमा आहे. या चित्रपटाचं बजेट 125 कोटी आहे. शिवाय या चित्रपटात ती साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. तिच्या करिअरसाठी हा चित्रपट खुप फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे हा चित्रपट जर अनन्याला सोडावा लागला तर अनन्याच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

समीर वानखेडेंच्या ‘त्या’ दाढीवाल्या मित्राचा नवाब मलिकांनी केला खुलासा

‘5 किलो लाडूची सोय करा’ म्हणत लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचा भांडाफोड

समीर वानखेडेंना दिलासा मिळाला असला तरी अटकेची टांगती तलवार कायम

आता कोरोनावर मात करण्यासाठी ‘या’ कॅप्सुलनं होणार उपचार

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट पण मृतांच्या आकड्यात वाढ, वाचा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More