महाराष्ट्र मुंबई

राज्यातील ‘या’ चार शहरांमध्ये 2 जानेवारीला कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होणार- राजेश टोपे

मुंबई | कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर 2 जानेवारीला होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली.

लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी 25 जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही. मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदुरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘उंचे लोगों की नीची पसंद है’; मुकेश खन्नांचा अजय देवगणला टोला

मुकेश अंबानींसाठी बॅडन्यूज; 2020नं जाताजाता त्यांनाही दिला दणका!

गुड न्यूज! नव्या वर्षात आरोग्य अन् ग्रामविकास विभागात इतक्या हजार पदांची भरती

कोरोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही- प्रकाश आंबेडकर

“आमच्या फायद्यासाठी कायदे आणलेत म्हणता, मग ते मागे घेतल्याने कुणाचं नुकसान होणार आहे?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या